स्त्री दुसऱ्याची असो वा स्वतःची – आदर समान असावा!
Woman Respect AGRLEKH : आजच्या समाजात स्त्रीच्या सन्मानाबाबत अनेक घोषणा, मोर्चे, कायदे, जनजागृती मोहिमा होत असल्या तरी वास्तवात परिस्थिती काही वेगळीच दिसते. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेकडे वाकडी नजर टाकणे, त्यांच्यावर अश्लील टिप्पण्या करणं, बिनधास्तपणे फोटो काढणं, सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी करणं,
हे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत. यापैकी बऱ्याचदा पुरुषांना हे करताना एका गोष्टीचा पूर्ण विसर पडतो – की त्यांच्या घरातही आई, बहिण, पत्नी, मुलगी अशा स्त्रिया आहेत. दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट नजर टाकताना आपण दुसऱ्याच्या घरातल्या आईवर, बहिणीवर, मुलीवर किंवा पत्नीवर नजर ठेवतोय, हे जाणीव आवश्यक आहे.

Woman Respect Agrlekh
स्त्री म्हणजे वस्तू नव्हे – व्यक्तिमत्त्व आहे. समाजात अजूनही काही पुरुष स्त्रीला एक “वस्तू” म्हणून पाहतात. तिचं सौंदर्य, पेहराव, चालणं, हसणं, बोलणं या सर्व गोष्टींवर टिप्पण्या करणं म्हणजे पुरुषार्थ समजतात. परंतु, हीच स्त्री कोणाच्या तरी घरची असते – एक प्रेमळ आई, एक काळजीवाहू बहीण, एक समर्पित पत्नी किंवा एक निरागस मुलगी.
स्त्रीचं शरीर, तिचा पेहराव, तिचा आत्मविश्वास हा कुणाच्याही नजरेचा विषय नसावा. तिचा आदर करण्याचा संस्कार घरातूनच मिळायला हवा. पण दुर्दैवाने काहींना घरातही असे संस्कार दिले जात नाही आणि मग ही पिढी स्त्रियांकडे वाकडी नजर टाकणं स्वाभाविकच समजते. त्यांच्या नजरेत Woman Respect शून्य असतो.
स्वतःच्या घरातल्या स्त्रियांना जपताना – दुसऱ्याचं काय?
कितीदा असं पाहायला मिळतं की एखादा माणूस
आपल्या घरातल्या बायका बाहेर गेल्या की काळजीत पडतो. कुणी वाईट नजर टाकेल का ? कुणी त्रास तर देणार नाही ना? कुणी पाठलाग तर करणार नाही? पण हाच माणूस दुसऱ्या स्त्रीकडे पाहताना स्वतःची नजर वाईट ठेवतो, हे विसरतो. ही शोकांतिका नाही का?
जर प्रत्येकाने हा विचार केला – “दुसरी स्त्री देखील कुणाच्या तरी घरातली
आहे. माझ्या घरातल्या स्त्रीला जर कुणी वाईट नजरेने पाहिलं तर मला काय वाटेल?” – तर किती गोष्टी टळतील. पण हा विचार करण्याची संवेदनशीलता अनेकांमध्ये दिसत नाही.
समाज म्हणजे एक आरसा आहे आपण समाजात जे करतो, तेच आपल्या घरावरही कधी ना कधी परत येतं. आपण दुसऱ्याच्या मुलीला त्रास दिला, तर उद्या कुणीतरी आपल्या मुलीला त्रास देऊ शकतो. आपण
कुणाच्या पत्नीला छेडलं, तर कुणीतरी आपल्या
पत्नीवर वाईट नजर टाकू शकतो. ही ‘कर्माची फेड’ आहे.
समाज हा आरसा आहे. आपण त्यात जसं चित्र रेखाटू, तसंच परावर्तित होणार. मुलांना योग्य संस्कार द्या संस्कार हे लहानपणापासूनच दिले गेले पाहिजेत. मुलांनी
स्त्रियांकडे केवळ स्त्री म्हणून नाही, तर माणूस म्हणून पाहावं, हे शिकवणं गरजेचं आहे. जर एक मुलगा लहानपणा पासून घरात स्त्रीचा आदर होताना पाहतो, तर तो स्वतःही त्याच आदराने बाहेरच्या स्त्रीकडे पाहतो. परंतु जर तो स्त्रीला छळायचं, दहशतीत, उपेक्षित ठेवायचं
हेच बघतो, तर तेच त्याच्या वागण्यातही उतरते. कायदा आहे, पण जबाबदारी समाजाची स्त्रियांवरील अत्याचारा विरोधात कठोर कायदे आहेत. पण
फक्त कायद्यांनीच बदल घडणार नाही. मानसिकतेत बदल हवा. तो बदल घरातून सुरू झाला पाहिजे.
प्रत्येक पुरुषाने स्वतःला विचारायला हवं –“मी जी नजर दुसऱ्याच्या स्त्रीवर टाकतोय, तीच जर कुणी माझ्या घरातल्या स्त्रीवर टाकली तर?” हा विचार मनापासून केला, तर वर्तनात बदल येईल. स्त्रीचा आदर आपोआप होईल.(Woman Respect Agrlekh)
स्त्रीचं अस्तित्व –
स्त्रीचं अस्तित्व तिच्या शरीरापुरतं मर्यादित नाही. तिच्या विचारांमध्ये, कर्तृत्वामध्ये, स्वप्नांमध्ये, आणि भावनांमध्येही एक अमूल्य विश्व आहे.
स्त्री कुठलीही असो – घरकाम करणारी असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारी, शेतात राबणारी असो किंवा शिकवणारी शिक्षक, प्रत्येक स्त्रीचं अस्तित्व समाजासाठी महत्त्वाचं आहे. त्यांचा सन्मान करणं, ही आपल्या सभ्यतेची कसोटी आहे.
पुरुषत्व म्हणजे रक्षण – छळ नाही
खऱ्या अर्थाने पुरुषत्व म्हणजे दुसऱ्याला सुरक्षित वाटेल असं वागणं. स्त्रीला त्रास देणं, अपमान करणं,
वाईट नजरेने पाहणं हे पुरुषार्थाचं लक्षण नाही. उलट,
दुसऱ्याच्या बहिणीला, आईला,मुलीला सन्मान देणं, गरज पडली तर मदतीचा हात देणं – हेच खरे पुरुषार्थ.
शेवटचा विचार –Woman Respect Agrlekh
दुसऱ्याच्या घरीही आई असते आपल्या घरी जशी स्त्री आहे, तशीच दुसऱ्याच्या घरीही असते. ती कुणाची तरी लाडकी आई आहे, कोणाची तरी बहिण आहे, कोणाचीतरी पत्नी आहे. तिच्याकडे पाहताना तिचं माणूसपण पाहा – शरीर नाही.
जर प्रत्येक पुरुषाने हा विचार मनावर कोरून घेतला, तर अनेक स्त्रिया न घाबरता रस्त्यावर चालू शकतील, ऑफिसमध्ये काम करू शकतील, स्वप्न पाहू शकतील. आणि एक भयमुक्त, सन्मानित,
समता असलेला समाज घडेल.
Woman Respect Agrlekh
लेखन
मनिष महादेव जोशी_₹udra
हे देखील वाचा – दारूचे राजकारण : स्वस्तात व्यसन, महागात बळी !

फार छान लेख, सर्वांनी सर्व स्त्रियांचा आदर केला पाहिजे. 👌👌👍👍